ताज्या घडामोडी

जयश्री जाधव यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी सज्य

कोल्हापूर : आज कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव ताईंच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभा महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, मा. मालोजीराजे छत्रपती, मा. राजेश क्षीरसागर, यांच्या प्रमुख उपस्थितीत व कोल्हापूरकरांच्या प्रचंड उत्साहात संपन्न झाली.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी चंद्रकांत आण्णांना आपण सर्वांनी संधी दिली होती. मात्र, लोकसेवेपायी कार्यरत असताना त्यांचं दुर्दैवी निधन झाले.

लोकांच्या सेवेसाठी आण्णांनी आपल्या तब्बेतीची काळजी न करता पुरामध्ये आणि कोरोनाच्या संकटकाळामध्ये अहोरात्र कार्य केले. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आण्णांनी कृतीतून कोल्हापूरवासीयांना विकासात्मक दृष्टिकोन दिला.

आण्णांचा पश्चात ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सगळ्यांची इच्छा होती. मात्र, आपल्या स्वार्थी राजकीय इच्छा शक्तीपायी भाजपने ही निवडणूक स्वाभिमानी कोल्हापूरकर जनतेवर लादली आहे.

कॉंग्रेसने ५० वर्षात काय केले? हे सांगायला बिंदू चौकात येऊन चर्चा करण्याचे आवाहन मी स्वीकारले आहे. कोण किती विकास केला यावर कधीही चर्चा करायला मी तयार आहे. तुम्ही पाच वर्षे काम केले असते तर मतदारसंघ सोडून पुण्याला जाण्याची लाजिरवाणी वेळ आली नसती.

जयश्री ताईंनी नगरसेवक म्हणून काम करीत असतांना आठ कोटी रुपयांची विकासात्मक कामे केली आहेत. कोल्हापूरच्या विकासाचे आण्णांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ताराराणींच्या नगरीतील पहिली महिला आमदार म्हणून जयश्री ताईंना आपण प्रचंड मतांनी विजयी कराल असा विश्वास वाटतो.

ही निवडणूक कोल्हापूरची स्वाभिमानी जनता विरुद्ध भाजप अशी आहे. आजच्या या प्रचार सभेला झालेली गर्दी ही जयश्री ताईंच्या विजयाची नांदी आहे.

– ना. सतेज (बंटी) डी. पाटील

Related Articles

Back to top button
??????