ताज्या घडामोडी

तहानलेल्याला घोटभर पाणी पिऊ घालणे ही आपली संस्कृती :  मौलाना अजहर सैय्यद

कोल्हापूर : तहानलेल्यांची तृष्णा भाग्यविण्याएवढा धर्म नाही. म्हणूनच उन्हाळा आला की सामजिक कार्याचे भान ठेऊन काही सामजिक संस्था व दानशूर व्यक्ती स्वखर्चाने पाणपोई सुरू करत असतात. परंतु अलीकडच्या काळात पाण्याचा व्यापार सुरू झाला आणि पाणपोईचा धर्म बाटलीबंद झाला आहे. अन् समाजातील सहदयता संपली की काय? म्हणूनच दुष्काळात पाणपोया लुप्त होत चालल्याची खंत नागरिकांकडुन व्यक्त होत आहे.

सामजिक कार्याचे भान ठेऊन जमियत उलमा -ए शहर कोल्हापूर या संघटनेच्या वतीने शाहू कॉलेज विचारे माळ येथे पानपोईचे शुभारंभ करण्यात आले. याप्रसंगी मौलाना अजहर सैय्यद यांनी बोलताना सांगितले की जमियत उलमा – ए शहर कोल्हापूरच्या सर्व पदाधिकारी यांनी मिळून ज्या ठिकाणी पानपोईची गरज आहे अशा ठिकाणी सर्वांनी मिळून त्या ठिकाणी पानपोई सुरू कराव्यात तसेच तहानलेल्याला घोटभर पाणी पिऊ घालणे ही आपली संस्कृती असल्याचे मौलाना अजहर सैय्यद यांनी सांगितले.

यावेळी मेहबूब भाई महालदार (जॉ सेक्रेटरी), हाफिज जावेद शेख (जनरल सेक्रेटरी), हाफिज समीर उस्ताद ( नाईब सदर ), हाफिज फैय्याज (मेम्बर), मौलाना इमरान सैय्यद. (जॉ सेक्रेटरी ) इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
??????