ताज्या घडामोडी
Trending

शुभेच्छांच्या वर्षावात इंडिया 24 लाईव्ह शुभारंभ सोहळा संपन्न

मान्यवरांच्या हस्ते लोगो प्रकाशन व पुरस्कार वितरण

कोल्हापुर : कोल्हापुरात नव्याने सुरू झालेल्या इंडिया 24 लाईव्ह न्यूज पोर्टल भव्य शुभारंभ सोहळा कोल्हापुरात शाहू स्मारक हॉलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, तसेच सर्व क्षेत्रातील हितचिंतक, मान्यवर यांच्या शुभेच्छांच्या वर्षावात कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली .यावेळी प्रमुख उपस्थिती ग्रोबझ इंडिया अर्बन निधी लि.चे चेअरमन डाॅ. विश्वासजी कोळी, माजी डी. वाय. एस.पी.करवीर आर.आर.पाटील, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष यशवंतराव हाप्पे,अँड.धनंजय पठाडे, शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिस निरीक्षका सौ. स्नेहा गिरी माजी महापौर को.म.न.पा. निलोफर आजरेकर, म.या.चॅ.ट्र. मुंबई युवराज गवळी, शिवसेना नेते राजू सावंत, राष्ट्रवादी महिला आघाडी स्वाती काळे उपस्थित होते.

अध्यक्षस्थानी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षका स्नेहा गिरी म्हणाल्या, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, तळा तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम करून न्यूज पोर्टलच्या माध्यमातून चांगली ओळख निर्माण करावी.
यावेळी करवीर चे माजी डी.वाय.एस.पी आर. आर. पाटील म्हणाले आजची बदलती वाचन प्रणाली माध्यमाने गरज ओळखून कोल्हापुरात इंडिया 24 फोर लाईव्हने नाव लौकिक करावे.
अँड. धनंजय पठाडे म्हणाले, पत्रकार विभागाने आवाज सर्व सामान्यांचा आपल्या ब्रीद वाक्य प्रमाणे काम करून समाजामध्ये वेगळी ओळख निर्माण करावी.
माजी सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे यशवंतराव हाप्पे म्हणाले, पत्रकारांनी पत्रकारिता कशी असावी, या विषयी मार्गदर्शन केले समाजाच्या अनेक प्रश्नावर निर्भीडपणे पत्रकारिता करून समाजापुढे आपली वेगळी चांगली ओळख निर्माण करावी.
राजू सावंत यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व युवराज गवळी म्हणाले सर्वच पत्रकारांनी निर्भीडपने,निस्वार्थ पणाने पत्रकारिता करावी व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात केले. समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन मुख्य संपादक बाजीराव गावकर, सहाय्यक संपादक रवी कोल्हटकर, संपादक मुबारक आत्तार, अमित भालेकर, शिवाजी खापणे, रिदम निंबाळकर, अभिषेक कांबळे, भाऊराव पाटील , आयान आत्तार कुलदीप खोत , सृष्टी कांबळे आदी ने केले होते.
प्रास्ताविक रवीसागर हाळवणकर तर आभार बाजीराव गावकर यांनी मानले.

Related Articles

Back to top button
??????