ताज्या घडामोडी

शरद पवार यांनी आमदारांना धमकी देणे योग्य नाही

देवेंद्र फडणवीस : आमदार सुनिल शेळके प्रकरणी प्रतिक्रीया

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मावळचे आमदार सुनिल शेळके यांना इशारा दिला होता. मावळमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांनी म्हटले होते ‘ आमच्या कार्यकर्त्यांना जर दमदाटी केली, आता पुन्हा जर असे केले तर शरद पवार म्हणतात मला “. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया समोर आली आहे.

शरद पवार साहेब मोठे नेते आहेत. ५५ वर्षे ते राजकारण करत आहेत. या स्तरावरील नेत्याने एका आमदाराला धमकी देणे योग्य नाही. शरद पवार यांनी त्यांच्या विधानाचा पुर्नविचार करावा. ते कोणत्या स्तरावर आहेत याचा विचार करावा.

लोणावळा येथे होणाऱ्या शरद पवार यांच्या सभेला कार्यकर्त्यांनी जाऊ नये असं सुनिल शेळके यांनी धमकावले असल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली होती. त्यानंतर पवार यांनी शेळके यांना इशारा दिला होता

Related Articles

Back to top button
??????