ताज्या घडामोडी

जाहिरातींवर सरकार करणार तब्बल ८५ कोटींचा खर्च !

मुंबई : आगामी लोकसभा निवडूकीच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकार ८४ कोटी रुपये जाहिरांतीसाठी खर्च करणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासाठी मंजूरी दिली आहे. जनतेच्या पैशावर इतका मोठा खर्च होणार असल्याने विरोधक काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत विविध माध्यमांमधून या जाहिराती प्रसारित केल्या जातील.

शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती, उपक्रम, विकासकामे शासकीय संदेश यांचा प्रसार करण्यासाठी या जाहिराती देण्यात येतील असे सरकारचे म्हणने आहे. यामध्ये प्रिंट मिडीयासाठी २० कोटी, इलेक्ट्रॉनिक मिडीयासाठी २० कोटी ८० लाख, होर्डिंग्ज – बस- ट्रेन – वॉल पेटींग आदींसाठी ३७ कोटी ५५ लाख, तर सरकारी संदेशांसाठी ७५ लाख अशा रकमा वितरीत होणारआहेत.

Related Articles

Back to top button
??????