आपला जिल्हा

मराठा समाजाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना शासनाच्या अभिनंदनाबाबत निवेदन सादर

कोल्हापूर : मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात मराठा समाजाकडून प्रदीर्घ कालावधीचा संघर्ष, आंदोलने, मोर्चे व उपोषण करुन मराठा आरक्षण मिळण्याची मागणी होत होती. या आरक्षणाची मागणी विधीमंडळामध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आली. या बद्दल सकल मराठा समाजाच्यावतीने प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार,  विरोधी पक्षनेता विधानसभा विजय वडेट्टीवार, विरोधी पक्ष नेता विधान परिषद अंबादास दानवे व विधीमंडळ सदस्यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला असे नमूद आहे.

शासनाकडे या निवेदनातून काही मागण्या करण्यात आल्या यात शासनाने दिलेल्या मराठा आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करुन येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये मराठा विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा. शासन नोकर भरतीमध्ये मराठा समाजास दिलेल्या आरक्षणाचा त्वरित लाभ देण्यात यावा. त्यासाठी आवश्यक प्रक्रीया सुरु करावी. मराठा शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेती व शेतीपुरक व्यवसायासाठी लागणार अर्थसहाय्य करुन मराठा शेतकरी वर्गाला लाभ मिळवून द्यावा. कुणबी नोंदीचे प्रलंबीत राहीलेले दाखले त्वरीत देणेत यावे. मराठा आरक्षण कोर्टात टिकवण्यासाठी शासनाने कायदेशीर बाबींची पुर्तता  करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, संजयसिंह साळोखे, प्रसन्न शिंदे-शिराळकर, विक्रमसिंह जरग, जितेंद्र पाटील,विकास सुर्वे, गितांजली पाटील, संभाजीराव खेबूडकर, पद्मा पाटील, सम्राट बदाले, राजू तोरस्कर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
??????