ताज्या घडामोडी

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा मुहूर्त ठरला ?

शरद पवार- उद्धव ठाकरे भेट

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीतील पक्षांमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. बुधवारी ६ रोजी महाविकास आघाडीची जागवाटपाबाबत चर्चा होणार आहे, त्यामध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमिवर शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यात एक महत्वाची बैठक पार पडली.

महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडील कीती जागा द्यायच्या या वर उद्या होणाऱ्या चर्चेत निर्णय होणार आहे. खासदार शरद पवार, उद्धव ठाकरे व संजय राऊत यांची पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओक याठिकाणी एक बैठक पार पडली. यामध्ये ६ मार्च रोजी जागवाटपाबाबत अंतिम निर्णय घेण्याचे ठरले असल्याचे सूत्रांकडून कळते.

सिल्वर ओकवर झालेल्या बैठकीत उद्या होणाऱ्या मविआच्या बैठकीत कोणते मुझे महत्वाचे आहेत यावर चर्चा करण्यात आली. वंचित बहूजन आघाडीला नेमक्या कोणत्या जागा द्यावयाच्या याविषयी खलबते झाली असून, एकून ४८ जागांचे वाटप लवकरात लवकर करणे व महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांचे नियोजन करणे. यावर या दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.

Related Articles

Back to top button
??????