आपला जिल्हा

कोल्हापूरची जागा शिवसेनेने सोडली

महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांना संधी मिळण्याची शक्यता

कोल्हापूर : आगामी लोकसभेसाठी कोल्हापूर मतदारसंघावरुन महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु होती. आता मात्र या जागेचा तिढा सुटला आहे. या जागेवरुन शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आपला दावा सोडला आहे. त्यामूळे महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात शिवसेना सांगलीमधील जागा घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

या घडामोडीनंतर कोल्हापूरच्या ठाकरे गटाच्या शिवसेनेत नाराजी पसरल्याचे समजते. दरम्यान तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच समजेल असे वक्तव्य शाहू महाराजांनी एका कार्यक्रमादरम्यान केले होते. तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही शाहू महाराज उमेदवार असतील तर आनंदच होईल असे वक्तव्य कोल्हापूर दौऱ्याप्रसंगी काढले होत. त्यामुळे आता शाहू महाराज यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.

Related Articles

Back to top button
??????