ताज्या घडामोडी

बारावीचा पेपर देऊन आल्यावर बापावर अंत्यसंस्कार

वडीलांचे निधन होऊन देखील काळजावर दगड ठेवून आपला बारावीचा पेपर दिला असा दुर्दैवी प्रसंग मुरगूड येथील गणेश महादेव कांबळे या विद्यार्थ्यावरआला

मुरगुड सकाळी अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वडीलांच्या आकस्मित निधन झाले. त्यातच मुलाचा बारावीचा पेपर दुःखाचा डोंगर ते दुसरीकडे भविष्याची चिंता अभ्यास नियमित मार्क चांगले पडले पाहिजे, असा कायांचा वडिलांचा हिरो अशा मनस्थितीत त्याने वडिलांचे निधन होऊन देखील काळजावर दगड ठेवून आपला बारावीचा पेपर दिला. अशा दुर्दैवी प्रसंग मुरगूड येथील गणेश महादेव कांबळे या विद्यार्थ्याला आला.

वडील नगरपालिकेत सफाई कामगार. कॉलेज करत गणेश घरात मदत व्हावी यासाठी एका झेरॉक्स सेंटरचे काम करत. सकाळी अचानक गणेश त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. सारे घर दुःखात बुडाले. गणेशला शिक्षकांनी पेपरसाठी नेले खरे तर तब्बल तीन ते चार तास  परीक्षेसाठी वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे थांबवले पेपर देऊन आलेला गणेश वडिलांच्या मृतदेहावर ध्याय मोकलून रडला आणि गणेशच्या वडिलांचा इहलोकीची प्रसंग संपला.
मुरगूड येथील पाटील कॉलनीमध्ये वास्तवात असणारा आणि शिवराज जुनियर कॉलेज मध्ये आहे विज्ञान शाखेत शिकणाऱ्या गणेश महादेव कांबळे या मुलाचे वडील महादेव गणेश कांबळे वय वर्षे 64 यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मित निधन झाले. कोल्हापुरात उपचार चालू असताना महादेव कांबळे हे मयत झाल्याची बातमी घरात मिळतात अकस्मात झालेल्या निधनाने घर शोकसागरात बुडाले वडील मयत झाल्याची बातमी समजताच गणेश आभाळ कोसळले

वर्गशिक्षक उदय शेट्टी तसेच अमर पवार राजू कांबळे यांनी गणेश चे सांत्वन  करत धीर दिला यानंतर धीरगंभीर अवस्थेत व जडअंतकरणाने गणेश परीक्षेसाठी गेला. मुलाचा पेपर होईपर्यंत तिकडे वडिलांचा मृतदेह तब्बल तीन तास थांबवला. पेपर देऊन येताच वडिलांकच्या मृतदेहावर कोसळत गणेश धाय मोकलून रडू लागला. त्यामुळे सर्वांचाच हुंदका फुटला.अखेर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

Back to top button
??????