ताज्या घडामोडी

‘आप’ ला कार्यालय सोडण्याचे आदेश

मुंबई : आम आदमी पक्षाला सुप्रीम कोर्टाला दणका दिला आहे. दिल्ली येथे असलेले आप चे कार्यालय १५ जून पर्यंत रिकामे करण्याचे आदेश कोर्टाने पक्षाला दिले आहेत. त्यांचे कार्यालय असलेली जागा कोर्टाला दिलेली होती. तेथून पक्षाचे कार्यालय हटवावे अशी तक्रार करण्यात आली होती.

आपचे कार्यालय जिथे आहे ती जागा कोर्टाच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यासाठी देण्यात आली होती. पण दिल्ली सरकारने ती जागा आम आदमी पक्षाला दिली होती असा दावा केला आहे. याप्रकरणी हाय कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी होऊन ती जा- गा कोर्टाच्या ताब्यात द्यावी असा आदेश हायकोर्टानेही दिला होता. या निर्णयाविरोधात आपने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण सुप्रिम कोर्टानेही हे कार्यालय खाली करण्यास सांगितले आहे. निवडणूका असल्याने १५ जून पर्यंत मुदत दिली आहे. तसेच नवीन कार्यालयासाठी पक्ष सरकारकडे अर्ज करु शकतो असेही कोर्टाने म्हटले आहे. तसेच संबधित जागेवर हायकोर्टाच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासी संकूल होणार आहे तिथे कोणत्याही पक्षाचे कार्यालय असता कामा नये असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Back to top button
??????