ताज्या घडामोडी

घोड्यावर बसलो म्हणजे यांना वाटते घोडा आपलाच !

उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टिका

मुंबई : ‘गद्दारांच्या नायकाला विचार काय दिलं नव्हत? सर्वकाही देऊन सुद्धा पाठीत वार केला. यांच्याकडे ऐवढा पैसा आहे की हे लोक दाढी खाजवायलासुद्धा माणसे ठेवतील. घोड्यावर बसलो म्हणजे यांना वाटते हा घोडा आपलाच आहे. पण हाच घोडा कसा लाथ मारतो ते बघाच ” अशी घणाघाती टिका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

पनवेल येथे ठाकरे गटाच्या शिवसेनेची जनसंवाद सभा पार पडली यावेळी ते बोलत होते. ठाकरे पुढे म्हणाले भाजपाकडे प्रचंड पैसा आहे. पीएम केअर फंडाचे लाखो रुपये कुठे गेले. असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. पुढे त्यांनी भाजपावर टिका करताना म्हटले की भाजपाचे सरकार पुन्हा आले तर या देशातील या शेवटच्या निवडणूका ठरतील. भाजपाला संकटात ज्या पक्षाने साथ दिली तो पक्ष तुम्ही फोडाला. इतके नतद्रष्ट राजकारणी या देशाने पाहिले नसतील. शिवसेनेने तुम्हाला खाद्यांवर घेऊन फिरवले नसते तर तुम्हाला खांदा द्यायला चार लोकही जमले नसते.

शिवसेना तुम्ही फोडली तरी कट्टर शिवसैनिक हे आजही माझ्याबरोबर आहेत. बाळासाहेबांना जाऊन इतकी वर्षे झाली पण या शिवसैनिकांनी शिवसेना सोडली नाही. असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

Related Articles

Back to top button
??????