ताज्या घडामोडी

जगन्नाथ पुरीच्या मंदिरात घुसले बांगलादेशी

मुंबई : जगप्रसिद्ध जगन्नाथ पुरीच्या मंदिरात ९ बिगर हिंदू घुसल्याने एकच खळबळ उडाली आहे. नियमांच उल्लंघन करुन मंदिरात घुसरलेल्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करुन चौकशी सुरु केली आहे. त्या सर्वांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. यामध्ये म्हटले होते की काही गैर हिंदू मंदिरात प्रवेश करत आहेत तसेच नियमांचे उल्लंघन करत आहेत. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तत्काळ मंदिर परिसरातून ९ जणांना ताब्यात घेतले.

पुरीच्या मंदिराच्या नियमानुसार फक्त हिंदू भाविकच मंदिरात प्रवेश करु शकतात. पुरीचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक सुशील मिश्रा यांनी सांगितले की ताब्यात घेतलेल्यांपैकी एकजण हिंदू आहे. तर इतरांची चौकशी सुरु आहे.

Related Articles

Back to top button
??????