ताज्या घडामोडी

हास्यजत्रा फेम दत्तू मोरेला म्हाडाची लॉटरी

मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे अनेकांच्या मनात घर केलेला अभिनेता दत्तू मोरे आता आपल्या हक्काच्या घरात रहायला जाणार आहे. आपल्या अभिनयाने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फूलवणार दत्तू मोरे ठाणे येथील वागळे इस्टेट मधील रामनगर भागतल्या छोट्याशा चाळीत राहतो. तेथील रहिवाशांनी तो राहत असलेल्या चाळीला ‘दत्तू चाळ” असे नाव दिले आहे. आता मात्र दत्तूला त्याचे हक्काचे घर मिळाले आहे. म्हाडाच्या कोकण मंडळने काढलेल्या लॉटरीमध्ये चक्क एक नाही तर दोन घरांची लॉटरी दत्तू मोरे याला लागली आहे. त्यामूळे लवकरच तो चाळीमधून फ्लॅटमध्ये राहायला जाणार आहे.

याबाबत आनंद व्यक्त करताना दत्तू म्हणालो पहिल्याच प्रयत्नात म्हाडाचे घर मिळाले याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. चाळीत राहताना टोलेजंग इमारतीत घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहिले होते. ते आता पूर्ण होत आहे. पण माझे बालपण चाळीत गेल्याने फ्लॅट संस्कृतीत मी कितपत रमेन हे माहित नाही. असे त्यांने प्राजंळपणे कबूल केले.

Related Articles

Back to top button
??????