ताज्या घडामोडी

यंदाचा उन्हाळा होणार कडक

मुंबई : यंदा उन्हाच्या तिव्र झळा बसण्याची शक्यता आहे. मार्च ते मे महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा जास्त तापमान नोंदवले जाण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रासह दक्षिणेकडे उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय महापात्रा यांनी मार्च ते मे महिन्याच्या कालावधीतील हवमान अंदाजाची पत्रकार परिषदेत माहिती दिली.

पुढे ते म्हणाले पॅसिफीक महासागरात एल निनोची तिव्रता कमी होऊ लागली आहे. एल निनो मोसमी पावसाच्या सुरवातील संपूष्टात येईल. हिंदी महासागरातील इंडियन ओशन डायलोप हा वातावरणीय घटक मार्च ते मे या काळात तटस्थ होईल असे महापात्रा यांनी सांगितले.

एल निनोची तीव्रता कमी होत असली तरी त्याचा परिणाम मात्र तापमान वाढण्यात होणार आहे. तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा आदी राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटा अधिक प्रमाणात येऊ शकतात. असे महापात्रा यांनी स्पष्ट केले. 

मार्चमध्येही काही ठिकाणी पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडेल. मार्चमध्ये १९७१ ते २०२० या कालावधीत सरासरी २९ मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. यंदा त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button
??????