ताज्या घडामोडी

राहूल गांधी यांना बॉम्बने उडविण्याची धमकी

सुरक्षेमध्ये करण्यात आली वाढ

मुंबई : दिल्ली येथील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांना बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. तसे इनपुट पोलिसांना मिळाले आहेत.

महाराष्ट्रातल्या नाशिक पोलिसांना याबाबत इनपूट मिळाले आहेत. राहूल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांच्याप्रमाणे बॉम्ब हल्ला करुन त्यांना उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘भारत जोडो” न्याय यात्रेदरम्यान हा हल्ला होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. धमकीनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने राहूल यांच्या निवास्थानी सुरक्षा वाढविली आहे. त्याचबरोबर युपी आणि मध्यप्रदेशच्या पोलिसांना राहूल गांधी यांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सध्या राहूल गांधी यांना झेड प्लस सुरक्षा आहे. यामध्ये १० पेक्षा जास्त एनएसजी कमांडो व पोलिस कर्मचाऱ्यांसह ५५ जवान सुरक्षा पुरवत असतात. यामध्ये प्रत्येक कमांडो हा मार्शल आर्टचा स्पेशालिस्ट असतो. दरम्यान धमकी देणार हा माथेफिरु असून त्याची चौकशी करुन त्याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे माहिती मिळाली आहे.

Related Articles

Back to top button
??????