ताज्या घडामोडी

पतंप्रधान मोदी पुन्हा वाराणसीतूनच !

भाजपाची १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई : पंतप्रधान नरेद्र मोदी पुन्हा वाराणसी मतदारसंघातूनच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी लोकसभेसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली आहे. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी पंतप्रधान हे पुन्हा वाराणसीमधूनच लढणार असल्याचे सांगितले.

भाजपाकडून १६ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेश यामधील १९५ जागांचा निर्णय झाला असल्याची माहिती देखील तावडे यांनी दिली. मोदी यांच्यासोबत ३४ केंद्रीय व राज्यमंत्री देखील निवडणूक लढवणार आहेत. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती जाहीर करण्यात आली. तत्पूर्वी गुरुवारी भाजपाच्या केंद्रीय समितीची बैठक पार पडली यामध्ये चर्चा हाऊन उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Related Articles

Back to top button
??????