ताज्या घडामोडी

मनोज जरांगे यांच्या छातीत लागले दुखू

उपचार सुरु : ॲसिडीटीमुळे दुखत असल्याची डॉक्टरांची माहिती

आंतरवली सराटी : मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांच्या छातीत काल रात्री दुखू लागले होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी डॉक्टरांनी त्यांच्यावर रात्री १० वाजता उपचार सुरु केले. रात्री १.३० वाजता त्यांच्या इसिजी काढला आहे.

मागील काही दिवस जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगगर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवारी डिस्र्जाज देण्यात आला होता. त्यानंतर ते अंतरवली येथे पोहचले मात्र रात्रीच त्यांच्या छातीत दुखू लागल्याने डॉक्टरांनी त्यांचा इसिजी काढला. पण अॅसिडीटीमूळे त्यांच्या छातीत दुखत असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. अशक्तपणा जाणवत असल्याने रात्री उशिरा त्यांना सलाईन लावण्यात आले.

Related Articles

Back to top button
??????