आपला जिल्हा

शाहू महाराजांनी निवडणूकीला उभे राहू नये

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे मत

कोल्हापूर : कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज हे आम्हा सर्वांचे आदर्श आहेत आणि त्यांचे स्थान तसंच रहावे त्यामुळे त्यांनी निवडणूकीला उभे राहू नये असे आम्हाला वाटते. त्यांनी राजकारणात यावे किंवा न यावे हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. असे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

पुढे त्यांनी सांगितले की मी महायुतीमधील एका पक्षाचा मी मंत्री आहे. त्यामुळे कोल्हापूरातील दोन्ही जागा निवडूण आणण्यासाठी मला जिवाचे रान करावे लागले तरी मागे हटणार नाही. जागावाटपाबाबत तीन्ही पक्षाचे नेते ठरवतील त्याप्रमाणे आम्ही अंमलबजावणी करू, मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपाबरोबर सरकार स्थापन केले त्यावेळी त्यांच्या जागा त्यांना द्यायच्या ठरल्या होत्या. आता जागावाटपाचा निर्णय सर्वांच्या समंतीने होईल. असेही त्यांनी सांगितले.

सुळकूड पाणी योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी उद्या सर्व नेत्यांची बैठक बोलविली आहे त्यामध्ये सविस्तर चर्चा होईल. इचलकरंजीला शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा व्हावी यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. कोल्हापूर शहरात शंभर कोटींच्या रस्त्यांची कामे सुरु आहेत. अजून १०० कोटींचा निधी मागितला आहे. त्यामुळे आता रस्त्यांची कामे पुर्ण होतील त्यामुळे आता हाडांचे दवाखाने बांधण्याची गरज पडणार नाही. असा चिमटा रस्त्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना काढला.

Related Articles

Back to top button
??????