आपला जिल्हा

कामगारांसाठी गृहपयोगी वस्तु संच वाटप कार्यक्रमाचा पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर : महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत बांधकाम कामगरांना गृहपयोगी वस्तु संच वाटप शुभारंभ कार्यक्रम गुरुवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता महाराणी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कार्यक्रमास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, पुणे महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर व इतर लोकप्रतिनीधींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त वि. वि. घोडके यांनी कळविले आहे.

Related Articles

Back to top button
??????