आपला जिल्हा

भाजपाच्या चिन्हावर लढणार या केवळ अफवाच

खासदार मंडलिकांनी स्पष्ट केली भूमिका

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर लोकसभेच्या जागेवरुन चर्चांना उधान आलेले आहे. संभाजीराजे, शाहू छत्रपती यांच्या नावांची चर्चा विविध पातळीवर सुरु आहे. त्यातच कोल्हापूरची जागा ही महायुतीतील सत्ताधारी पक्ष भाजपाकडे जाणार असल्याने मंडलिक यांना भाजपाच्या चिन्हावर लढावे लागणार असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे सध्याचे विद्यमान खासदार व शिवसेना शिंदे गटाचे असलेले संजय मंडलिक यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. त्यांनी आज आपली भूमिका मांडली असून आपण शिवसेनेच्याच चिन्हावरच लढणार असल्याचे जाहीर केले आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्याच्याही चर्चा होत होत्या. मंडलिक यांनी या सर्व वृतांचे खंडण करत आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली.

ते म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे सक्षम नेते आहेत. त्यामुळे जेव्हा राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले त्यावेळी फक्त एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटलो होतो. सध्या शहा यांना भेटलो नसल्याचे मंडलिक यांनी स्पष्ट केले.

आमची मागणी २३ जागांची

शिवसेनेत फुट पडल्यानंतर १३ खासदारांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आगामी लोकसभेसाठी शिंदे गटाला २३ जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. आम्ही शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरच निवडणूक लढवणार आहोत. भाजपाच्या चिन्हावर निवडणूका लढणार या केवळ अफवाच आहेत.

शाहू महाराज वडीलांसमान

सध्या कोल्हापूरात छत्रपती शाहू महाराज यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता आहे. त्याविषयी बोलताना ते म्हणाले शाहू महाराज यांना मी वडीलांसमान मानतो. पण निवडणूकीत समोर कोण आहे हे मी पाहिलं नाही. असे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button
??????