राजस्थान येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान सुशोभीकरण
अमजद नदाफ यानी महाराष्ट्राच्या मातीची राष्ट्रप्रेमाची भावना दाखवून दिली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गौरवोदगार
कोल्हापुर : राजस्थान येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे सुशोभीकरण व मूर्तीची रंगरंगोटी करण्यासाठी पुढाकार घेऊन हुपरी जिल्हा कोल्हापूर येथील माजी नगरसेवक अमजद नदाफ यांनी महाराष्ट्राच्या मातीची राष्ट्रप्रेमाची भावना या पुढाकारातून दाखवून दिली.असे गौरवोद्गार भारताचे केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यानी एका पत्राद्वारे व्यक्त केले आहेत .
काही महिन्यापूर्वी अमजद नदाफ हें अजमेर राजस्थान येथे गेले होते .तेथे मूख्य चौकात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज उद्यान दिसले त्याचे रंग पूर्ण गेले होते त्यामुळे नदाफ यानी महापालिका व मुख्यमंत्री यांच्याशी पाठपुरावा करुन मूर्तीचे तसेच उद्यानाचे सुशोभीकरण करुन घेतले होते. या महत्वपूर्ण कार्याची दखल भारताचे केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यानी घेतली व त्यानी नदाफ यांना अभिनंदनाचे पत्र पाठवून आपण केलेले हें कार्य कौतुकास्पद अभिनंदनीय आणि प्रेरणादायी असल्याचे मंत्री गडकरी यानी म्हटले आहे. या पत्राबरोबरच त्यांच्या कार्यालयाने नदाफ यांच्याशी संपर्क साधून फोनवरून अभिनंदनही केले आहे .
हजारो किलोमीटर दूरवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्ती रंगकामासाठी राजस्थान सरकारशी संपर्क केला व त्यात ज्येष्ट पत्रकार व मा नगरसेवक अमजद नदाफ यांना यश आले. भारतातील सौहार्दभावच त्यांच्या या कृतीतून अभिव्यक्त झाला. अमजद यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यांनी लोकोपयोगी व देश उपक्रमांमध्ये सातत्य ठेवावे, यासाठी ना गडकरी यानी शुभेच्छा दिल्या आहेत .