ताज्या घडामोडी

कूर ग्रामपंचायतीसाठी जि. प. निधीतूनघंटा गाडी प्रदान

 

कूर ता. भुदरगड येथील विविध विकास कामाच्या उद्घाटन सोहळा व जीवन दादा पाटील यांच्या जि प निधीतून घंटागाडी प्रदान व सत्कार मूर्तींचा गौरव असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. या संयुक्त कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जि. प. सदस्य पी डी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि प सदस्य जीवन दादा पाटील यांनी कुर गावाला दोन कोटी निधी देऊन काम पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कुर् ग्रामपंचायतीस यशवंत पुरस्कार मिळालेबद्दल सरपंच अनिल हळदकर व अँड. मोहन पाटील यांची भुदरगड तालुका गारगोटीच्या बार असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व रणजीत पाटील यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. डांबरीकरण झालेल्या गावातील सर्व रस्त्यांचे लोकार्पण करणेत आले.

यावेळी उपस्थित माजी जि.प. सदस्य पी. एस. कांबळे ह.भ.प. अध्यक्ष बाळासाहेब खाडे दत्तात्रय हळदकर सरपंच अनिल हळदकर माजी सरपंच संदीप पाटील माजी उपसरपंच सुरेंद्र धोंगडे माजी सरपंच वसंतराव चोडणकर, वसंतराव प्रभावळे, शशिकांत प्रभावळे ,डी. के. कुंभार ,सदाशिव हळदकर आण्णासो पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बी. डी . देसाई डॉ. संदीप पाटील, पप्पू कुलकर्णी ,केरबा खाडे, संदीप हळदकर ,साताप्पा हळदकर आनंदा खाडे संजय भोपळे रंगराव कांबळे सुनील भारमल विलास राजिगरे,मंगल सुतार पोलीस पाटील युवराज धोंगडे बाबुराव मिसाळ शिवाजी पाटील गणपतराव पाटील रंगराव देसाई दत्तात्रय कल्कुटकी,दत्तात्रय डवरी सहदेव कांबळे लता सहदेव कांबळे ,बापू चौधरी गावातील युवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
??????