ताज्या घडामोडी

भाजपा आनंदोत्सव

2 व्हीलर रॅली

 

कोल्हापूर ; पाच पैकी चार राज्यामध्ये विधानसभा निवडणुकी मध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल आज बिंदू चौक येथून 2 व्हीलर रॅलीने माधुरी बेकरी, कॉमर्स कॉलेज, दिलबहार तालीम, टेंबे रोड मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र आले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महेश जाधव भाजपा प्रदेश सदस्य महाराष्ट्र, राहूल चिकोडेभाजपा जिल्हाध्यक्ष कोल्हापूर महानगर, विजय जाधव भाजपा सरचिटणीस कोल्हापूर महानगर, अशोक देसाई भाजपा सरचिटणीस कोल्हापूर महानगर, सत्याजित उर्फ नाना कदम माजी नगरसेवक, अमोल पालोजी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कोल्हापूर महानगर, हेमंत आराध्ये भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कोल्हापूर महानगर, विजय खाडे पाटील माजी नगरसेवक व भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष कोल्हापूर महानगर, आजम जमादार भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष कोल्हापूर महानगर, नजीर देसाई,शाहरुख गडवाले भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा सरचिटणीस कोल्हापूर महानगर, नाजीम आत्तार भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा युवा प्रमुख कोल्हापूर महानगर, मंडल अध्यक्ष – सरचिटणीस, आघाडी मोर्चा अध्यक्ष, सरचिटणीस, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष व भाजपा प्रेमी सर्व कार्यकर्ते हे या 2 व्हीलर रॅलीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Back to top button
??????