आपला जिल्हा

चांदेवाडी गावामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचा‌ भव्य उद्घाटन सोहळा संपन्न

आजरा : चांदेवाडी ता आजरा गावामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचा‌ भव्य उद्घाटन सोहळा पार मनसे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा.श्री.नागेशदादा‌ चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितित‌ पार पडला.

यावेळी चांदेवाडी गावातील उद्योजक महादेव कोंडुसकर , सरपंच प्रभाकर कुंभार व गावातील अन्य‌ प्रतिष्ठित‌ व्यक्ती उपस्थित‌ होते. जिल्हा अध्यक्ष नागेशदादा चौगुले यांनी गावातील नागरिकांना मार्गदर्शन केले. ते‌ म्हणाले की ही शाखा उघडली आहे ती काही राजकारण करण्यासाठी‌ उघडले असेल असे मला वाटत‌ नाही तर ही शाखा ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के करायचं म्हणून राजकारण ह्या उद्दशाने उघडली आहे याचा मला खाञी आहे.मनसे आजरा तालुका उपाध्यक्ष आनंदा घंटे यांनीदेखील मनोगत‌ व्यक्त केले ते बोलले की चांदेवाडी सारख्या‌ संवेदनशील गावामध्ये मनसे ची‌ शाखा उद्घाटन होते‌ म्हणजे खऱ्या राजकारणाला आता सुरूवात होत आहे.
शाखा अध्यक्षपदी‌‌ सुमित‌ जाधव, शाखा उपाध्यक्ष पदी विशाल जाधव, शाखा सचिव पदी कार्तिक गिलबिले यांची‌ नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाची‌ सांगता पाहुण्यांचे‌ आभार मा.सरपंच‌ साहेब यांनी केले.
मनसे जिल्हा अध्यक्ष प्रभात‌ साबळे , महिला जिल्हा अध्यक्षा मा.पुनम भादवणकर मॅडम,तालुका अध्यक्ष अनिल निऊंगरे,तालुका उपाध्यक्ष कमलेश येसादे तालुका सचिवचंद्रकांत सांबरेकर वसंत‌ घाटगे व प्रथमेश सुकवे इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
??????