आपला जिल्हाताज्या घडामोडी

फोटोग्राफर व्हिडिओग्रापर अँड एडिटर असोसिएशनचे काम कौतुकास्पद

कोल्हापूर  :फोटोग्राफर , व्हिडिओग्राफर अँड एडिटर असोशियन नेहमीच फोटोग्राफरच्या हिताचे काम  नेहमीच करत आहे. कोविड काळात मदत, पूरग्रस्तांना मदत,तसेच अनेक सुविधा पत्रकारांच्या हिताच्या असोसिएशन करत आहे.  फोटोग्राफर नेहमीच दुसऱ्याच्या कौतुकीचे क्षण टिपण्याचे काम करत असतो. नुकताच १० वी आणि १२ वी च्या परीक्षांचे निकाल जाहीर झाला. यामधे असोसिएशन मधील सदस्यांच्या मुलांनी चांगले गुण मिळवले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी फोटोग्राफर व्हिडिओग्राफर अँड एडिटर असोसिएशन कोल्हापूर कडून हॉटेल जोतिबा येथे सत्कार सोहळा आणि प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

मा.श्री.जयदीप मोरे यांनी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर यांचे सोशल मीडिया आणि सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. राहुलजी चिकोडे, जिल्हाध्यक्ष, भाजपा आणि मा. जयदीप मोरे, सायबर तज्ञ उपस्थित होते.प्रास्ताविक असोसिएशनचे उपाध्यक्ष मा.अमर जाधव यांनी केले. यावेळी मा.श्री.राहुल चिकोडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. असोसिएशनचे अध्यक्ष मा श्री.जगदीश गुरव यांनी असोसिएशनची स्थापना आणि वाटचाल याबाबत माहिती दिली. कार्यक्रमास असोसिशनचे सेक्रेटरी मा.सायलस मनपाडळेकर तसेच संचालक अभिषेक शिवदास,प्रभात चौगुले,विनायक कुचगावे,संतोष जकाते, युवराज राऊत,सुरेश मोरे आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
??????