ताज्या घडामोडी

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली रेशीम उद्योग समुहाला भेट

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : रेशीम उद्योग शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. हा उद्योग करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करुन या उद्योगाला चालना देण्यासाठी प्रशासन शेतकऱ्यांना सर्व सहकार्य करेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

आरळे येथील रुक्मिणी दत्त रेशीम प्रक्रिया उद्योग केंद्र तसेच विविध उद्योग समुहांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी राज्य रेशीम सल्लागार समितीचे सदस्य डॉ. आदिकराव जाधव, रेशीम विकास अधिकारी डॉ. भगवान खंडागळे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी तानाजी पाटील, कोडोलीचे मंडल अधिकारी अभिजित पोवार, जिल्हा नियोजन विभागाचे किरण देशपांडे, आनंद उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव घाटगे, रुक्मिणी दत्त रेशीम उद्योग समुहाचे प्रमुख डॉ. अभिजित घाटगे उपस्थित होते. यावेळी बहुराष्ट्रीय कंपनीत शास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्याबद्दल सागर जाधव यांचा सत्कार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.

रेशीम उद्योगाचे महत्व, शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच कोष उत्पादन आदी विषयी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.रेशीम उद्योगाचे प्रमुख श्री. घाटगे प्रास्ताविकात रेशीम उद्योगांची उभारणी, तीन वर्षातील उद्योगांची प्रगती, येणाऱ्या अडचणी इ. विषयावर माहिती दिली.यावेळी आरळे गावचे सरपंच, शेतकरी उपस्थित होते. यावेळी अमित घाटगे यांनी स्वागत केले. तानाजी जमदाडे यांनी सूत्रसंचलन तर अनिकेत घाटगे यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button
??????