ताज्या घडामोडी

शरद मोहोळ हत्येचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावा

सकल हिंदू समाजाची मागणी

पुणे/ प्रतिनिधी
काही दिवांपूर्वी पणे कोथरुड परिसरात झालेल्या शरद मोहोळ हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावा अशी मागणी हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केली आहे. या हत्येमागे अतिरेकी संघटनांचा हात असण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखविली. हत्येचा कट पुण्यात एका हॉटेल मध्ये रचण्यात आला पोलिसांना त्याचे सिसिटीव्हि रेकॉर्ड सापडत नाही. गाडीत पैसे सापडले त्याचाही तपास लागत नाही. आता यासाठी २८ जानेवारीला मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पूणे येथे यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले या प्रकरणी पोलिसांवर राजकीय दबाव असण्याची शक्यता आहे. मोहोळ यांनी गो रक्षण चळवळ मोठ्या प्रमाणावर वाढविली. त्यामुळे हत्येमागे अतिरेकी संघटनांचे कटकारस्थान आहे का हेही तपासले पाहिजे. राजकारण आणि समाजकारणामध्ये मोहोळ यांचा कोणाशीही वाद नव्हता.
आतापर्यंत या प्रकरणी २४ जणांना अटक करण्यात आली आहे. रविवारी या कटातील विठ्ठल शेलार व रामदार मारणे व त्यांच्या दहा साथिदारांना नवी मुंबई येथून पोलिसांनी अटक केली आहे.

Related Articles

Back to top button
??????