ताज्या घडामोडी

अमूलला मात द्यायचे असेल तर संकलन केलेले सर्व दूध गोकुळ संघाला पाठवा – गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ.

गडहिंग्लज तालुका संपर्क सभा

गडहिंग्लज : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) संघाशी सलग्न गडहिंग्लज तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा गडहिंग्लज येथे संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्‍या अध्यक्षतेखाली व संचालक मंडळाच्या उपस्थित पार पडली.

यावेळी बोलताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले कि कोरोना संसर्गामुळे मागील काही वर्षे संपर्क सभा घेता आली नाही. आमचे नेते मंडळीनी आमच्यावर वीस लाख लिटर संकलनाचे लक्ष दिले आहे. ते पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहे. त्यासाठी महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालू आहे. लंपी आजारास गोकुळ न घाबरता लसीकरण मोहीम राबवत आहे. जर अमूलला मत द्यायचे असेल तर सर्वांनी संकलन केलेले सर्व दूध गोकुळ दूध संघाला पाठवावे, असे आवाहन केले.

यावेळी वैरण विकास, पशुखाद्य, वित्‍त, पशुवैद्यकीय, मिल्‍कोटेस्‍टर, संगणक, गुणनियंञण व दुध बिल या विभागावर सविस्‍तर व खेळी-मेळीत चर्चा होवून अडचणी समजावून घेवून त्‍या प्रश्‍नांचे निरसण करण्‍यात आले.

यावेळी संघाच्या दूध वाढ कृती कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विस्तार सुपरवाझर यांचा सत्कार करण्यात आले. गोकुळ मार्फत न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी तर्फे उतरवण्यात आलेल्या किसान विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले व संकलन, पशुसंवर्धन, वैरण विकास, पशुखाद्य, वित्‍त, मिल्‍कोटेस्‍टर, संगणक, गुणनियंञण व दुध बिल या विभागावर सविस्‍तर चर्चा होवून अडचणी समजावून घेवून त्‍या प्रश्‍नांचे निरसण करण्‍यात आले तसेच विविध सूचनाची नोंद घेण्यात आली.

यावेळी गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे, माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक विश्‍वासराव पाटील, संचालक युवराज पाटील, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य किसनराव कुराडे, जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती सतिश पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी तसेच गडहिंग्लज तालुक्यातील दूध संस्थाचे चेअरमन, संचालक, प्रतिनिधी, कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संस्‍था कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
??????