ताज्या घडामोडी

गुड न्यज : यंदा पाऊसमान सर्वसाधारण राहणार

येत्या दोन महिन्यात एल निनोचा प्रभाव कमी होण्याची शक्यता

गतसाली एल निनोचा थेट प्रभाव मान्सूनवर झाला होता. देशात अनेक ठिकाणी पावसाच्या प्रमाणात अनियमितता दिसून आली. मुख्य पावसाचे महिने कोरडेच गेले तर पिके काढणीच्या वेळी आलेल्या पावसाने मोठे नुकसान केल्याचे दिसून येते. एकंदरीच देशात पाऊस सरासरी कमी झाला. याला कारणीभूत म्हणजे एल निनो. यंदा मात्र पुढील दोन महिन्यात एल निनोचा प्रभाव कमी होणार असून आगामी मान्सून सर्वसाधारण राहणार असल्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे.
अमेरिकी हवामान एजन्सी नोआने या संस्थेने हा अहवाल दिला आहे. एल निनोच्या प्रभाव कमी झाल्याने मान्सून पूर्व काळात महासागराचे तापमान सर्वसाधारण राहण्याची शक्यता आहे. ही सकारात्मक बाब मानली जात आहे.
गेल्या वर्षी एल निनोचा प्रभाव थेट पर्जन्यमानावर झाल्याचा दिसून आला. महाराष्ट्रात सांगली, सातारा, सोलापूर, बीड, धाराशीव, हिंगोली, जालना, अकोला व अमरावती या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. अनेक ठिकाणी यंदा जानेवारीमध्येच पाणीटंचाई जाणवू लागली आहे.
एल निनोच्या जाऊन ला निनाचा प्रभाव वाढणार?
एल निनोचा प्रभाव ओसरल्यास प्रशांत महासागराचे तापमान न्युट्रल राहण्याची शक्यता ७३ टक्के आहे. तर ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये महासागराचे तापमान आणखी कमी होऊन त्याठिकाणी ला निनाचा प्रभाव ६० टक्के वाढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पर्जन्यमान सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक होण्याची शक्यता
आहे.
एल निनो, ला निना म्हणजे काय ?
विषुवृत्तीय प्रशांत महासारगराचे तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदले जाते त्याला एल निनो म्हणातात. महासागराचे तापमान ०.५ पेक्षा अधिक झाल्यास त्याला एल निनो म्हणतात. तर तापमान कमी झाल्यास ला निनाची परिस्थिती तयार होते. तापमान वाढल्याने जगभरातील वाऱ्यावर त्याचा परिणाम होतो. एल निनोमुळे मान्सून काळात बाष्प कमी होते त्यामुळे पावसाचे प्रमाणही कमी होते.

Related Articles

Back to top button
??????