ताज्या घडामोडी

शेअर बाजारात नवा विक्रम

प्रथमच सेन्सेक्स ७३,००० अंकाच्या पुढे, निफट्रीही २२,२०० च्या पार

मुंबई : मधल्या काळात झालेल्या पडझडीनंतर शेअर बाजारावर गुंतवणूकदारानी पुन्हा विश्वास दाखवण्यास सुरवात झाली आहे. आज बाजार सुरु झाल्यानंतर सेन्सेक्सने ७३००० चा टप्पा पार करत नवा विक्रम केला आहे.
तर निफटी अंकही २२२४८ च्या पुढे गेला. अजूनही बाजाराची घौडदौड सुरुच आहे. वाहन, बँकिंग, धातू क्षेत्राचा वाटा या वाटचालीत मोठा आहे. सध्या हिंदाल्को ३ टक्के वाढीसह टॉपवर आहेत. तर इन्फोसिस व टिसीएस टॉप लूजर्स आहेत. आज निफटी ०.२३ टक्क्यांच्या वाढीसह २२,२४८ अंकावर उघडला आहे. तर काल सेन्सेक्स ०.२९ टक्क्यांच्या वाढीसह ७३,२६७ अंकावर उघडला आहे.

Related Articles

Back to top button
??????