ताज्या घडामोडी

रेडिओचा ‘आवाज’ हरपला

प्रसिद्ध रेडिओ निवेदक अमिन सयानी यांचे निधन

मुंबई: “रेडिओचा आवाज” अशा उपाधीने गौरवलेले जेष्ठ निवेदक, सुत्रसंचालक अमीन सयानी यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. सयानी यांना बुधवारी सकाळी हृदयविकाराचा धक्का बसला त्यांनतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अमीन सयानी यांना वृद्धापकाळामुळे अनेक व्याधिंनी ग्रासले होते. अनेक वर्षे ते वॉकर घऊन चालत असत.

त्यांच्या जाण्याणे रेडिओच्या सुवर्णयुगाचा साक्षिदार हरपला. “बहनों और भाईंयो आप सुन रहे है.” हा आवाज कानावर पडला की लोकांच्या मनात आजही रेडिओचा काळ अवतरतो. सयानी यांनी आतापर्यंत १९ हजार जिंगल्सना आवाज दिला होता. त्यांच्या या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. रेडिओ सिलोन, विविध भारती या रेडिओ स्टेशनवरील ‘बिनाका गितमाला’ या त्यांच्या कार्यक्रमाने लोकांच्या मनावर राज्य केले होते. रेडिओचे श्रोते आजही त्यांच्या काळातील आठवणी जागवतात. ‘गीतमाला’ या कार्यक्रमाने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमामुळे त्यांना आठवड्याला ६५ हजारांवर पत्रं मिळत असत.

Related Articles

Back to top button
??????