ताज्या घडामोडी

ईडीची भिती दाखवल्याने अशोक चव्हाण यांचा राजीनामा : प्रणिती शिंदे

विविध प्रकरणात विनाकारण नाव गोवून महाविकास आघाडीतील नेत्यांना त्रास देण्याचे काम भाजप कडून होत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही ईडीची भिती दाखवली गेली त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला आहे. असा आरोप काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. चव्हाण यांच्या राजीनाम्याबद्दल त्या बोलत होत्या.

पुढे त्या म्हणाले नेत्यांवर दबाव टाकणे, ब्लॅकमेल करणे हे भाजपाचे तंत्रच आहे. मांईड गेम खेळून नेत्यांना आपल्याकडे वळवणे, ही भाजपची खेळी आहे. चव्हाण यांचा राजीनामा हे काँग्रेससाठी दुर्दैव आहे.  चव्हाण यांनीही हताश होऊन राजीनामा दिला आहे. काँग्रेसमधील आणखी काही नेत्यांना त्रास देणे सुरुच आहे.असले राजकारण देशात पहिल्यांदाच होत असल्याची टिकाही त्यांनी केली.

Related Articles

Back to top button
??????