ताज्या घडामोडी

राहूल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर होणार सुनावणी

७ मार्चला सुप्रीम कोर्टात सुनावणीस न्यायालयाची सहमती

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांविरोधातील अपात्रतेची नोटीस फेटाळल्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सहमती दर्शवली. ठाकरे गटाचे वकील कपील सिब्बल यांनी लवकर सुनावणी घेण्याची मागणी केल्यानंतर सरन्यायाधिश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला व न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने हे प्रकरण ७ मार्चला सुनावणीसाठी ठेवले आहे.

Related Articles

Back to top button
??????