ताज्या घडामोडी

शिंदे गटातील नेत्यांचा विधानसभेच्या लॉबीतच राडा ?

मध्यस्ती करणाऱ्या शंभुराज देसाईंनी दिले हे स्पष्टीकरण

मुंबई : विधीमंडळाचा आज शेवटचा दिवस होता. यात आज मंत्री दादा भुसे व कर्जतचे आमदार महेश थोरवे या सत्ताधारी शिंदे गटाच्यात आमदार व मंत्र्यामध्ये विधानसभेच्या आवारातच धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर मंत्री शंभुराज देसाई यांनी त्यांच्यामध्ये मध्यस्ती करुन हा वाद मिटवला. या घटनेने राजकीय वर्तळात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले आहे.

वाद झालाच नाही : शंभूराज देसाई

दरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. भुसे व थोरवे यांच्यात कोणताही वाद झाला नसून धक्काबुक्की झाल्याचा काय पुरावा आहे का ? असा प्रतिप्रश्न त्यांनी माध्यमांना केला. लॉबीमध्ये माध्यमांचा कोणताही कॅमेरा नाही तरी तुम्ही बातम्या कशा चालवता असे देसाई यांनी म्हटले आहे. एक मंत्री व एक आमदार फक्त चर्चा करत होते त्यावेळी फक्त आवाज वाढला. संबधित आमदारांना आम्ही बोलवून चर्चा केली. मोठ्या आवाजात बोलणे म्हणजे वाद नव्हे .

विधानपरिषदेत विरोधकांचा गदारोळ

मंत्री भुसे व आमदार थोरवे यांच्यातील वादाचे पडसाद विधानपरिषदेतही उमटले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित करत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. उपसभापती निलम गोरे म्हणाल्या या घटनेबद्दल तपासून माहिती घेतली जाईल. पण विरोधकांचे समाधान झाले नाही. उपसभापती गोरे व विरोधकांच्यात खडाजंगी झाले नाही, गोंधळ वाढत गेल्याने उपसभापतींनी कामकाज एक तासासाठी तहकूब केले.

ठाकरे गटाची टिका

दरम्यान या सर्व प्रकरणावर ठाकरे गटाची प्रतिक्रीया समोर आली आहे. सत्तेच्या मलिद्यासाठी एकत्र आलेले बोके आता एकमेकांना धक्काबुक्की करु लागले आहेत. स्वतः बदनाम आहेतच आता महाराष्ट्राला बदनाम करु लागले आहेत. असे ट्वीट ठाकरे गटाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
??????