ताज्या घडामोडी

केजरीवालांच्या घरावर केलेल्या हल्ल्याच्या विरोधात ‘आप’ची कोल्हापुरात मूक निदर्शने

कोल्हापुर ; दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली येथील निवास्थानी भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात घरासमोरील बॅरिगेट, बुम बॅरियर व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली गेली. द काश्मीर फाईल्स या चित्रपटाला युट्युबवर प्रकाशित करावे जेणेकरून सगळा देश हा चित्रपट पाहू शकेल असे वक्तव्य केजरीवाल यांनी केले होते. तसेच या चित्रपटाच्या कमाईतून काश्मिरी पंडितांचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करावे अशी मागणी ‘आप’ने केली होती.

हल्ल्याची बातमी समजताच ‘आप’ कार्यकर्त्यांनी छ. शिवाजी चौक येथे जमून मूक निदर्शने केली. काळ्या पट्टी लावत, निषेधाचे फलक हातात धरून या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवला.

‘आप’चा पंजाब मधील विजयाने भाजपच्या गोटात भीती आहे. याच उद्विग्नतेतून भाजपच्या कार्यकर्त्यांनी केजरीवालांच्या घरावर हल्ला केल्याचा आरोप ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी केला. ‘आप’च्या सर्वोच्च नेत्याच्या घरावर केलेल्या हल्ल्याने कोल्हापुरातील ‘आप’ कार्यकर्त्यांच्या मनात रोष निर्माण झाला आहे. योग्यवेळी याचे उत्तर देऊ अशी भूमिका यावेळी संदिप देसाई यांनी मांडली.

यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, उत्तम पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, मा विजय हेगडे प्राजक्ता डाफळे, अभिजित भोसले, आदम शेख, राज कोरगावकर, मयूर भोसले, ब्रिजेश पटेल, शुभंकर व्हटकर, विशाल वठारे, मंगेश मोहिते, प्रथमेश सूर्यवंशी, , किशोर खाडे, दिलीप पाटील, राकेश गायकवाड, लाला बिरजे, विजय भोसले, अभिजित कांबळे, सिमोन शियेकर, आनंदा चौगुले, संजय सूर्यवंशी, मंगेश मोहिते, श्रीकांत शिगवण, चेतन चौगुले, प्रभाकर चौगुले, राजेश खांडके आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
??????