ताज्या घडामोडी

ईद-ए-मिलादुन्नबी सन कोल्हापुरात मोठ्या उत्साहात साजरा

शांती, समता, बंधुत्व आणि सलोख्याचा संदेश देणाऱ्या हजरत मोहम्मद पैगंबर (ईद-ए-मिलादुन्नबी) यांच्या जयंतीनिमित्त ईद-ए-मिलादुन्नबी कमिटी तर्फे पैगंबर जयंतीची मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री.नाळे व मुस्लिम बोर्डिंग चेअरमन गणी आजरेकर यांच्या उपस्थितीत व यांच्या हस्ते नारळ वाढवून जुलूस (मिरवणूक) सुरुवात करण्यात आली. ईद-ए-मिलादुन्नबी कमिटी यांच्या वतीने जुलूस (मिरवणूक) शांततेत पार पडली असून मिरवणुकीची सुरवात ईदगाह मैदान कोल्हापूर शहर येथून सुरुवात करण्यात आली. यावेळी कमिटीचे संस्थापक अध्यक्ष हाजी फिरोज गुलमोहम्मद सतारमेकर, साजिद मकानदार ,मुबारक काझी, अल्ताफ काझी,हाजी रशीद काझी, मुल्ला इम्तियाज खान , शकील मुजावर , इम्तियाज पठाण , इरफान शेख ,आसिफ सदलगे, अल्फाज कछी ,रियाझ खान ,मुस्तफा नूराणी ,बालम झारी , लियाकत मुजावर.शफी अत्तार,इद्रिस कच्ची, बशीर मुजावर ,शकील मोमीन, वसीम मुल्ला , मन्सूर अत्तार, हर्षद कच्ची , खोदुस जीलानी ,शाहरूख गडवाले,जमीर मणेर,हाजी नासीर जिलानी, फैयाज शिकलगार व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
??????