ताज्या घडामोडी
२२ जानेवारीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी
प्रभू रामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त केंद्राचा निर्णय
अयोध्या नगरीत २२ जानेवारीला प्रभू रामाचा राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. आता या सोहळ्याची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. अयोध्येत राम मंदिर ट्रस्ट, योगी सरकार, व केंद्र सरकार यांची जोरदार तयारी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. याबाबत केंद्र शासनाने हे आदेश पारित केले आहेत. देशभरातील कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेता हा त्यांना सोहळा अनुभवता यावा यासाठी केंद्राने हा निर्णय घेतला आहे. यानुसार देशातील केंद्रीय कार्यालये, केंद्रीय संस्था, अर्धा दिवस म्हणजे दुपारी अडीच वाजेपर्यंत बंद असतील.