आपला जिल्हाताज्या घडामोडी

ए.सी.बी.चे डी.वाय.एस.पी.सरदार नाळे यांनी पदभार स्वीकारला

कोल्हापूर ,दि.१९ लाचलुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूरचे पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे यांनी नूतन पदभार स्वीकारला आहे. कोल्हापूर जिल्ह्या करवीर तालुक्यातील सांगरूळचे असून त्यांनी आतापर्यंत १५ वर्षे चंद्रपूर, नागपूर, नवी मुंबई, मुंबई आदी जिल्ह्यात सेवा बजावली आहे. ते उत्कृष्ट राष्ट्रीय कुस्ती खेळाडू आहेत. पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून ते राज्यात प्रथम आले होते. आज अखेर त्यांना शासनाकडून १४६ रिवार्ड मिळाले आहेत. सरकारी कामासाठी कोणी लाचेची मागणी करत असेल तर नागरिकांनी मो नं संपर्क ९८७३५०६५५५ संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
??????