तपोवन परिसरात श्री फार्मा मेडिकल स्टोअर्स व मॉलचे उद्घाटन
By,india 24 live news netwark news portel.in 30 oct. 2020
By,india 24 live news netwark news portel.in 30 oct. 2020
(कोल्हापूर प्रतिनिधी)
तपोवन परिसरात नव्याने सुरु झालेल्या श्री फार्मा मेडिकल व मॉल मुळे रुग्णांना उत्तम सेवा मिळेल ही अपेक्षा आहे. कोल्हापुर तपोवन परिसरात अशी मेडीकल स्टोअर्स अर्थात मॉल सुरु व्हायला हवीत. असे मत पोलीस दलाचे डी वाय एस पी शिवाजीराव जमदाडे यांनी व्यक्त केले. कळंबा जेल जवळ तपोवन परिसरातील श्री फार्मा मेडिकल स्टोर व मॉलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कळंबा व तपोवन परिसरातील लोकांना अल्पदरात औषधे उपलब्ध होण्यासाठी श्री फार्मा 24 तास सेवा देणारे मेडिकल स्टोअर व मॉल उपलब्ध करून देण्याचे काम श्री दिलीप गवळी यांनी केले आहे. त्यामुळे तपोवन परिसरात उत्तम सुविधा निर्माण झाली आहे. तसेच परिसरातील लोकांना महिन्याची लागणारे औषध मोफत घरपोच सेवा देण्यात येईल असे मत श्री फार्मचे प्रोप्रायटर श्री गवळी यांनी व्यक्त केले.
कळंबा येथे तपोवन परिसरात मुख्य मार्गालगत श्री फार्मा मेडिकल व मॉलची सुरवात करण्यात आली आहे. दिलीप गवळी यांच्या संकल्पनेतून मेडिकल स्टोअर्स व मॉलचे उद्घाटन डी.वाय.एस.पी. शिवाजीराव जमदाडे व शहर वाहतूक पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर प्रमुख उपस्थित दैनिक जनमतचे उपसंपादक व सरपंच सेवा संघाचे पुणे विभाग समन्वयक सुरेश राठोड, सामाजिक कार्यकर्त्या वसुमती देसाई, उदय जाधव, अभिजीत खतकर आदी मान्यवरांचे स्वागत गवळी परिवाराकडून करण्यात आले.
यानंतर वाहतूक निरीक्षक वसंत बाबर म्हणाले कोरोना महामारी च्या काळात सर्वकाही बंद होतं पण मेडिकल स्टोअर्स योध्याप्रमाणे आपली जबाबदारी निभावत होते. असेच मेडिकल स्टोअर व मॉल सुरू करून गवळी यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे असे म्हणत श्री गवळी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यानंतर युवराज गवळी, बाजीराव गावकर, शशिकांत पोरे, मृणाली पाटील, दत्तात्रय पाटील, कृष्णात पाटील, सुदेश मोरे, पांडुरंग पाटील आदी मान्यवर यांनीही श्री गवळी यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी दिलीप गवळी, दीपा गवळी, दर्शन गवळी, सोनाली गवळी, देवेंद्र गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी युवराज गवळी यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले.