ताज्या घडामोडी

राष्ट्रीय नमुना पाहणी :७९ वी फेरी सर्वेक्षणास निवड केलेल्या कुटुंबांनी सखोल व विश्वासार्ह माहिती द्यावी जिल्हा सांख्यिकी अधिकाऱ्यांचे आवाहन

कोल्हापूर : अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत राष्ट्रीय नमुना पाहणीच्या सर्वेक्षणाचे काम केले जात असून राष्ट्रीय नमुना पाहणी :७९ वी फेरी अंतर्गत जुलै २०२२ ते जून २०२३ या कालावधीत “Comprehensive Annual Modular Survey”आणि “आयुष पद्धतीबाबत सर्वेक्षण” या विषयांवर विस्तृत माहिती संकलित केली जाणार आहे. ही माहिती संकलनासाठी निवड केलेल्या जिल्ह्यातील कुटुंबानी सखोल व विश्वासर्ह माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी सा. दि. देवस्थळी यांनी केले आहे.

CAMS अंतर्गत शाश्वत विकास ध्येय निर्देशक तयार करण्याच्या उद्देशाने आवश्यक प्राथमिक माहिती गोळा केली जाईल. आर्थिक-सामाजिक परिमाणांमध्ये देशाच्या कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी तसेच जागतिक स्तरावर तुलना करण्यासाठी माहिती संकलित केली जाईल. मागील महिन्यांतील औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये तरुण आणि प्रौढांचा सहभागाचा दर, मागील 365 दिवसांत इंटरनेट वापरणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण, सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या सुविधा वापरणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण, 15-24 वर्षे वयोगटातील शिक्षण, रोजगार आणि प्रशिक्षणामध्ये सहभाग नसलेल्या तरूणांचे प्रमाण, बारमाही रस्त्यालगतच्या 2 कि.मी. परिसराच्या आत राहणाऱ्या ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण, वित्तीय संस्थेत खाते असलेल्या प्रौढांची टक्केवारी, वित्तीय संस्थेत खाते असलेल्या महिलांची टक्केवारी, प्रति 1 लाख प्रौढांमागे कर्जदारंची संख्या, वैयक्तिक मोबाईल फोन असलेल्या व्यक्तींचे स्त्री-पुरूष प्रमाण, लोकसंख्येचे स्वच्छता सेवा आणि साबण आणि पाण्याने हात धुण्याची सुविधा या बाबींचे प्रमाण, वीज उपलब्ध असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण, बँक किंवा इतर वित्तीय संस्थेत किंवा मोबाईल-मनी-सेवा प्रदात्यामध्ये खाते असलेल्या प्रौढांचे (15 वर्षे आणि त्याहून अधिक) प्रमाण, कौशल्याच्या प्रकारानुसार माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान कौशल्य असलेले आणि प्रौढांचे प्रमाण कमी/जास्त प्रवासी क्षमतेच्या सार्वजनिक वाहतूक थांब्यापासून 0.5/1 कि.मी. अंतराच्या आत असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण, घरापासून 500 मीटरच्या आत खुल्या जागेचा परिसर असणाऱ्या कुटुंबांचे प्रमाण, तंत्रज्ञानानुसार मोबाईल नेटवर्क असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण.

‘आयुष पध्दतीबाबत सर्वेक्षण’अंतर्गत आयुष पद्धतीचा वापर याबाबत कुटुंबांकडून माहिती गोळा करण्यात येणार आहे.आयुष पद्धतीची माहिती असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी, पाहणीच्या अगोदर मागील 365 दिवसात आयुष पद्धतीद्वारे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी, रुग्णालयात दाखल केल्यावर उपचार घेण्यासाठी वापरलेली आयुष पध्दती (आयुर्वेद, योगा आणि नॅचरोपॅथी, युनानी, सिध्दा आणि होमिओपॅथी) बाबत माहिती, पाहणीच्या अगोदर मागील 365 दिवसात उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यावर आयुष पद्धती व आयुष औषधांवर झालेला खर्च, गेल्या 365 दिवसांत आयुष औषधांचा वापर करून उपचार घेतलेल्या बाह्य रुग्णांची टक्केवारी, प्रसूतीपूर्व आणि प्रसुती पश्चात आयुष औषधाचा वापर याबाबतची विस्तृत माहिती गोळा करण्यात येणार आहे.

या पाहणीच्या निष्कर्षाचा उपयोग राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर विविध धोरणे आखण्यासाठी व नियोजनासाठी केला जातो. सदरील माहिती पूर्णतः गोपनीय ठेवली जाणार असून या माहितीचा वापर करून शासनाचे कोणतेही विभाग माहिती देणाऱ्या कुटुंबावर कारवाई करू शकत नाही. त्यामुळे पाहणीसाठी ज्या कुटुंबांची निवड केली जाणार आहे, त्यांनी सखोल व विश्वासार्ह माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही  देवस्थळी यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
??????