ताज्या घडामोडी

उचगावच्या संदीप हॉटेलचा परवाना कायमस्वरूपी रद्द जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

कोल्हापूर – उचगाव पूर्व (ता. करवीर) येथील हॉटेल संदीप व बिअर बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पारित केला. नकुल शंकरराव पाटील यांच्या तक्रार अर्जावरील सुनावणीनंतर हा निर्णय झाला.
हॉटेल संदीपचा परवाना मिळवताना गांधीनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सपोनि उदय वसंतराव डूबल व राज्य उत्पादन शुल्कचे तत्कालीन अधीक्षक, दुय्यम निरीक्षक व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांनी अधिकाराचा गैरवापर करून शासनाची ठकवणूक केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी नकुल पाटील यांनी तक्रारीत केली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार गांधीनगरचे सपोनि सत्यराज घुले व राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सुनावणीमध्ये संदीप पाटलुबा पाटील याने अधिकाऱ्यांना हाताशी धरून हॉटेल संदीप, संदीप परमिट रूम व बिअर बार व संदीप लॉजिंगला निवासी वस्तीत परवाना मिळवल्याचे नकुल पाटील यांनी निदर्शनास आणले. राज्य महामार्ग अंतर निर्बंधमुक्त असल्याचा खोटा दाखला राज्य उत्पादन शुल्कचे तत्कालीन अधीक्षक दुय्यम निरीक्षक यांनी दिल्याचे उघड झाले. सादर केलेले कागदपत्रात केलेले फेरफार, सर्व पुरावे व सुनावणीअंती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या हॉटेलचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले

Related Articles

Back to top button
??????