ताज्या घडामोडी

भाजपा प्रदेशाध्यक्ष आम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्य भुदरगड तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना रेनकोट वाटप

मंजुनाथ ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने चालवला उपक्रम

गारगोटी : कोणत्याही आपत्तीच्या काळात जिवाची पर्वा न करता नेहमीच कार्यरत रहाणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांनी आपले काम नेटाने आणि जोमाने केले. त्यांच्या कामाचं कौतुक करावं तेवढं थोडचं आहे असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील यांनी केले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आम. चंद्रकांत दादा पाटील यांच्या जन्म दिनानिमित्य भुदरगड तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना रेनकोट वाटप प्रसंगी ते बोलत होते.आकुर्डे येथील मंजुनाथ ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री.पाटील पुढे म्हणाले गेली अनेक वर्षे वृत्तपत्रे विक्रेते आपल्या जिवाची पर्वा न करता आपले वृत्तपत्र टाकण्याचे काम करतात. महापूर असो कोरोना असो अथवा कोणतेही आपत्ती असो या काळात त्यांनी आपले काम सोडले नाही. उन,वारा, पाऊस याची तमा न बाळगता ते आपले काम करतात. त्यांना पावसाळ्यात आपले काम व्यवस्थीत करता यावे यासाठी आम्ही त्यांना रेनकोट भेट म्हणून देत आहोत.यावेळी जिल्हा परिषदेचा आचार्य प्र.के. अत्रे पुरस्कार प्राप्त सकाळचे पत्रकार धनाजी आरडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी धनाजी आरडे हे सत्काराला उत्तर देताना म्हणाले , गेली २२ वर्षे पत्रकारीता क्षेत्रात काम करत असताना वृत्तपत्र विक्रेते आणि आपला संमध आला. कोणताही विषय निर्भिडपणे मांडताना सर्वांचे सहकार्य मिळाले, त्याचा परिपाक म्हणून मला जिल्हा परिषदेने आचार्य प्र.के. अत्रे पुरस्कार दिला. माझा त्याबद्दल या कार्यक्रमात सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी राहील.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अलकेश कांदळकर, तालुका संघाचे संचालक संतोष पाटील, पी.बी. खुटाळे,रणजित आडके, राहुल चौगले, भगवान शिंदे,भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अमोल पाटील, बाजीराव देसाई, ज्ञानदेव वेदांते, संतोष कुरळे, सुनिल पाटील, अवधुत राणे, सचिन हाळवणकर, सचिन देसाई, लखन लोहार, विक्रम लोहार, अक्षय कुपटे, प्रविण पाटील, नवनाथ लोहार, ऋषीकेश हुंदळकर,एकनाथ पाटील, संजय रबाडे, अतुल लोहार, अजित सुतार,गंगाराम मांगोरे, अमोल मोहीरे,पत्रकार रविराज पाटील, ,अनिल कामीरकर, शिवाजी पाटील सदा साळोखे, नितीन बोटे,यांचे सह वृत्तपत्र विक्रेते व कार्यकर्ते उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक पांडुरंग वायदंडे यांनी केले तर आभार सुनिल तेली यांनी मानले.

Related Articles

Back to top button
??????