आपला जिल्हा

विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यामार्फत कार्यक्षेत्रातील महिलांना आधुनिक ऊस शेतील प्रशिक्षण

शिराळा : चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यामार्फत कार्यक्षेत्रातील महिलांना आधुनिक ऊस शेतील प्रशिक्षणासाठी वसंतदादा साखर संकुल मांजरी बुद्रूक (पुणे) पाठविण्यात आले. आज कारखाना स्थळावरून उषा पंडित पाटील व मंगल तानाजी जमदाडे (दोघी मांगले), शितल सुहास चव्हाण व संध्याराणी विनोद पाटील (दोघी पाडळेवाडी), राजश्री हणमंत पाटील (बांबवडे), नंदा भीमराव पाटील (आकुर्ळे), सुनंदा सर्जेराव पाटील व पल्लवी कृष्णदेव पाटील (दोघी शिराळे खुर्द) या महिला रवाना झाल्या. त्यांना कारखान्याचे संचालक, सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक अमोल पाटील, सचिव सचिन पाटील, मुख्य शेती अधिकारी विठ्ठल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
??????