ताज्या घडामोडी

जंगलात आढळला मृत गवा

भुदरगड : टिक्केवाडी (ता. भुदरगड) येथील जांभूळ पाणी परिसरात एका गव्याचा मृत्यू झाला. घटना घडून दोन आठवडे उलटून गेले तरी याचा वन विभागास थांगपत्ता नसल्याने गव्याच्या मृत्यूविषयी साशंकता व्यक्त केली जात असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गव्याचा मृत्यू चोरट्या शिकरीतून झाल्याची चर्चा आहे.

भुजाईदेवी मंदिरापासून भोंगिऱ्याकडे जाणाऱ्या पायवाटेलगत जांभूळ पाणी परिसरात गव्याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याने त्याचे शरीर कुजून दुर्गंधी पसरली तरी वनविभागास काहीच माहिती नाही. भुजाईदेवी मंदिर परिसरात पर्यटकांची वर्दळ असते. घनदाट जंगल असल्याने या परिसरात वन्यप्राण्यांचा मोठा वावर आहे. गवा मृत होऊन दोन आठवडे झाले तरी वनविभागास याचा थांगपत्ता लागत नसेल तर वनविभागाचे कर्मचारी करतात तरी काय? असा सवाल वन्यप्रेमींतून उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Back to top button
??????