ताज्या घडामोडी

जिल्ह्यात 16 एप्रिलपर्यंत बंदी आदेश

कोल्हापूर :  मुबारक आतार

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला असून दिनांक 12 एप्रिल रोजी मतदान व दिनांक 16 एप्रिल रोजी मतमोजणी केली जाणार आहे. दिनांक 12 एप्रिल रोजी मतदान, दिनांक 14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, दिनांक 15 व 16 एप्रिल रोजी श्रीक्षेत्र वाडीरत्नागिरी जोतिबा डोंगर येथील चैत्र पोर्णिमा यात्रा तसेच जिल्हयात मोर्चा, रॅली, उपोषण, आत्मदहन, धरणे अशी संभाव्य आंदोलने तसेच विविध पक्ष, संघटनांची त्यांच्या मागण्यांसाठी होणारी आंदोलने या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये 16 एप्रिल 2022 पर्यंत जिल्ह्यात बंदी आदेश जारी केला आहे. शस्त्रे, बंदुका, सोटा, तलवारी, भाले, सुऱ्या लाठी अगर काठी किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशा कोणत्याही वस्तू बरोबर न नेणे. कोणताही ज्वालाग्राही पदार्थ अगर स्फोटके पदार्थ वाहून नेणे. दगड अगर तत्सम शस्त्रे साठविणे अगर सहज फेकून त्याचा मारणेसाठी उपयोग करणे. व्यक्ती अगर त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन दहन करणे. सार्वजनिक घोषणा करणे, गाणी म्हणणे आणि गाणी अथवा वाद्ये वाजविणे. असभ्य हावभाव करणे, ग्राम्यभाषा वापरणे, सभ्यता व नितीविरूध्द निरनिराळ्या जातीच्या नैतिक भावना दुखावल्या जाऊन त्यांच्यामध्ये भांडणे-बखेडे निर्माण होऊन शांततेस अगर सुव्यवस्थेस बाधा येईल अशी सोंगे अगर कोणताही जिन्नस तयार करणे व त्याचा प्रसार करून उपयोग करणे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव जमणेस, मिरवणुका काढणे व सभा घेणे.

हा हुकुम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजाविणेचे संदर्भात तसेच निवडणुकीचे कामकाज करताना उपनिऱ्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधिक्षक अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाने पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे. अशा व्यक्तींना तसेच सर्व जातीधर्माचे सण/उत्सव/ जयंती/ यात्रा इ. हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा यांना लागू पडणार नाही.

Related Articles

Back to top button
??????