ताज्या घडामोडी

आईच्या पाय पूजनाने तरुणाने केला गृहप्रवेश

कागल : अनुर तालुका कागल येथील प्रगतशील युवा शेतकरी संदीप सावडकर यांनी आपल्या घराचा गृहप्रवेश होम हवन वास्तुशांती यासारख्या कर्मकांडांना फाटा देऊन आपल्या आईच्या पाय पूजनाने गृहप्रवेश करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे हा कार्यक्रम बळीराजाच्या फोटो पूजनाने संपन्न झाला यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक सागर कोळी यांनी बळीराजाचा इतिहास व आयुष्यातील आईचे महत्व याबद्दल मार्गदर्शन केले त्याच बरोबर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील गायकवाड यांनी कर्मकांड रूढी-परंपरा यांना छेद देऊन क्रांतिकारी पाऊल उचल याबद्दल संदीप सावडकर यांचे अभिनंदन केले
या कार्यक्रमाला राजेंद्र कुंभार विठ्ठल आरडे ,राजेंद्र वांगळे अनिल सावडकर ,विजय नरके राजेंद्र माने ,अनिल साठे ,उमेश दानवाडे आदी मान्यवर उपस्थित होते .

Related Articles

Back to top button
??????