ताज्या घडामोडी

सरकारमध्ये अॅम्ब्युलन्स घोटाळा

विजय वडेड्डीवार यांचा गंभीर आरोप, ८०० कोटींच्या कामासाठी ८ हजार कोटीचे टेंडर

महायुती सरकारमध्ये सध्या अॅम्ब्युलन्स खरेदीमध्ये मोठा अपहार झाला आहे. असा आरोप काँग्रेसचे नेते विधानसभा विरोधीपक्षनेते विजय वडेड्डीवार यांनी केला आहे. सध्या महाराष्ट्र सरकारने कार्डीयाक अॅम्ब्युलन्स घेण्याचे टेंडर काढले असून यामध्ये सनदी अधिकऱ्यांना भिती दाखवून मोठा आर्थिक घोटाळा सरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एक कार्डीयाक अॅम्ब्युलन्स घेण्यासाठी ५० लाख खर्च येतो. अशा १५२९ अॅम्ब्युलन्ससाठी एकूण ७६४ कोटी ५० लाख रुपये खर्च होतात. पण या कामासाठी ८ हजार कोटीचा खर्च करण्यामागे काय गौडबंगाल आहे हे जनतेला कळले पाहिजे. सनदी अधिकाऱ्यांनी ४५ दिवसाची टेंडरची मुदत ठेवली होती. यात बदल करुन टेडंरला १० दिवसांची मुदत दिली आहे. सनदी अधिकऱ्यांना बदलीची भिती दाखवून टेंडरची रक्कम फुगवली गेली आहे. अॅम्ब्युलन्स मधून पैसे खाण्याचा नवा धंदा सरकारमधील काही मंडळीनी सुरु केला आहे. हा घोटाळा आता उघड झाला असून सरकारने टेडर रद्द करुन दोषी अधिकाऱ्यांची चौकशी केली पाहीजे अशी मागणी वडेड्डीवार यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले की हे गेड्यांच्या कातडीचे सरकार आहे. सरकारमधील तिन्ही पक्ष मिळून सामुहिक घोटाळे करत आहेत. तलाठी भरती मध्येही मोठा घोटाळा झाला आहे. आमचे सरकार परीक्षेसाठी २०० रु फॉर्म फी घेत होते हे सरकार १००० रु घेत आहे. यावर आवाज उठविणाऱ्यांवर, मोर्चे काढणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. असाही आरोप वडेड्डीवार यांनी केला.

Related Articles

Back to top button
??????