ताज्या घडामोडी

रांगणा पब्लिक स्कूलचे कार्य कौतुकास्पद

कडगाव : कडगाव ता. भुदरगड येथे रांगणा पब्लिक स्कूलचे संस्थापक प्रकाश डेळेकर व त्यांच्या पत्नी दिपांजली या उभयतांचे शिक्षणाबरोबरच विविध सामाजिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे.येणाऱ्या काळात नव्या पिढीला स्पर्धा परीक्षेबरोबरच इंग्रजी शिक्षण काळची गरज आहे असे प्रतिपादन कोवाड महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मोहन घोळसे यांनी केले. कै.लक्ष्मीबाई डेळेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आयोजित महिला मेळावा,स्पर्धा व विविध क्षेत्रातील गुणवंत महिलांचा गुणगौरव अशा संयुक्त कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.मुदाळच्या सखी फाउंडेशनच्या अध्यक्षाच्या राजनंदीनी पाटील,मुंबईचे निवृत्त पोलीसउपायुक्त शिवाजीराव पाटील प्रमुख उपस्थित होते. तर कडगावच्या मा. सरपंच सिंधूताई दबडे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होत्या.
यावेळी संस्थापक प्रकाश डेळेकर यांनी स्पर्धात्मक डिजिटल व विविध उपक्रमशील शिक्षणाबरोबरच ग्रामीण भागाची गरज लक्षात घेऊन अकरावी सायन्स या जूनपासून सुरु करणार असल्याचे प्रास्ताविकात सांगितले. यावेळी किलबिल या क्रिडोलॅबचे उद्घाटन व विविध क्षेत्रातील गुणवंत महिलांचा गौरव शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन .राजनंदीनी पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी विज्ञान प्रदर्शन, पाककला,प्रश्नमंजूषा,व संगीतखुर्ची आदी स्पर्धांचे आयोजन केले होते. या मेळाव्याला गोकुळचे मा.संचालक विलास कांबळे,सुनील देसाई,अरुण संस्थेचे अध्यक्ष मिलिंद देसाई, क्रिडोच्या हरसिना गुप्ता, ग्रा प सदस्य तेजस्वीनी देसाई, अरुण देसाई,वैभवी देसाई,अपर्णा देसाई ममदापूर पत्रकार नितीन बोटे, प्रकाश खतकर,विक्रम केंजळेकर आदी मान्यवर महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत संतोष सुतार, सुत्रसंचालन नारायण मोहिते,आभार सोनाली धवन,तर प्रशांत सरनाईक, श्रावण पाटील, संगीता कांबळे, रेश्मा शेनवी,संतोषी भेंडवडेकर आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

Related Articles

Back to top button
??????