ताज्या घडामोडी

कोल्हापूर-बंगळूर विमानसेवाही बंद

कोल्हापूर; प्रवाशांचा अत्यंत चांगला प्रतिसाद असलेली कोल्हापूर-बंगळूर विमानसेवा बंद करण्यात आली आहे. मुंबई, अहमदाबाद पाठोपाठ आता बंगळूरचीही कोल्हापूरशी असलेली ‘एअर कनेक्टिव्हिटी’ खंडित झाली. नव्या मार्गावर विमानसेवा सुरू होण्याऐवजी आहे त्या मार्गांवरील कनेक्टिव्हिटी’ खंडित झाली. नव्या मार्गावर विमानसेवा सुरू होण्याऐवजी आहे त्या मार्गांवरील सेवा बंद होत आहेत.कोल्हापूर-बंगळूर मार्गावर दि. 9 डिसेंबर 2018 पासून विमानसेवा सुरू झाली. दररोजच्या सेवेमुळे भविष्यात या मार्गावर आणखी सेवा विस्तारेल, असे चित्र होते. मात्र, चांगल्या पद्धतीने सुरू असलेली ही सेवा दि. 27 मार्चपासून बंद झाली आहे.

Related Articles

Back to top button
??????