ताज्या घडामोडी

शासकीय आय. टी. आय. गडहिंग्लज येथे ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरु

कोल्हापूर : शासकीय आयटीआय गडहिंग्लज शाधना, माळ, शेंद्री रोड, गडहिंग्लज येथे प्रवेश सत्र 2022 करीता एकूण 11 व्यवसायांकरिता ऑनलाईन प्रवेश अर्ज दि. 15 जून पासून सुरु झाले आहेत. प्रवेशाबाबतचे सविस्तर वेळापत्रक लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून उमेदवारांनी त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आवाहन गडहिंग्लज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यानी केले आहे.

प्रवेश अर्ज ऑनलाईन ITI Admission Portal: http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भरावेत. प्रवेश अर्ज भरल्यावर माहिती बरोबर असल्याची खात्री करून प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून जमा करावे. मागासवर्गीय उमेदवारांना प्रवेश शुल्क रु. 100 व सर्वसामान्य उमेदवारांना रु. 150 याप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे. प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर अर्जातील माहिती गोठविण्यात येईल व त्यानंतर माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही. प्रवेश अर्ज भरलेल्या उमेदवारांनी पुढील सर्व ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी त्यांचा पासवर्ड जतन करुन ठेवणे आवश्यक आहे.
शासकीय आयटीआय गडहिंग्लज येथे प्रवेशाकरिता मार्गदर्शन कक्ष सकाळी 10 ते 1 या वेळेत स्थापन करण्यात आला आहे. संस्थेत एकूण 11 व्यवसाय असून एक वर्ष मुदतीचे 4 तर दोन वर्ष मुदतीचे 7 व्यवसाय आहेत. चालू वर्षी दोन्ही मिळून एकूण 296 जागा भरल्या जाणार आहेत. मुलींसाठी ड्रेस मेकिंग हा स्वतंत्र व्यवसाय अभ्यासक्रम आहे. प्रवेशासाठी एकच अर्ज भरणे आवश्यक आहे. दुबार अर्ज केल्यास उमेदवार प्रवेश प्रक्रियेमध्ये अपात्र ठरला जाईल.
गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांकडे सर्व मूळ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे अन्यथा प्रवेश नाकारला जाईल. संस्थेत 50 मुलांना राहण्यासाठी वसतिगृहाची सोय उपलब्ध असून, शासकीय नियमाप्रमाणे एसटी / बस पास सवलत तसेच इबीसी सवलत आहे. तसेच जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 90 टक्के तर जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी 10 टक्के जागा राखीव ठेवल्या असल्यामुळे या प्रवेश सत्रामध्ये जिल्ह्यातील अधिकाधिक उमेदवारांना प्रवेशासाठी जास्तीच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत.

Related Articles

Back to top button
??????